वाहतूक नियंत्रक कुनकवळेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

आचरा –अर्जुन बापर्डेकर
आचरा येथील एसटी वाहतूक नियंत्रण कक्षात गेली आठ वर्षे प्रामाणिक सेवा देणारे आणि प्रवाशांशी प्रेमाने वागणारे वाहतूक नियंत्रक
मधुकर गणपत कुनकवळेकर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर आचरा येथील श्री देव रामेश्वर मॅजिक प्रवासी वाहतूक चालक मालक रिक्षा संघटनेच्या वतीने भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण हिर्लेकर,विजय सावंत,बाळू बाणे,शानू फर्नांडिस, पाडावे,प्रसाद चव्हाण, चंद्रशेखर मेस्त्री, महामंडळाचे क्रिष्णा पेडणेकर आदी उपस्थित होते.गेली आठ वर्षे आचरा तिठा येथील एसटी वाहतूक नियंत्रण कक्षात सेवा देताना कुणकवळेकर यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागत चांगले काम केले होते.यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत आचरा येथील मॅजिक रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला