कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने मोफत भात बियाणे

सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम
ग्रामपंचायत कलमठच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. 15 वित्त आयोग मधुन शेतकऱ्यांना हे बियाणे देण्यात आले. खालची कुंभारवाडी,लांजे वाडी मधील 90 शेतकऱ्यांनी लाभ घेतला.यावेळी सरपंच संदीप मेस्त्री , ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर ,सदस्य स्वाती नारकर ,दिनेश गोठणकर ,नितीन पवार ,श्रेयस चिंदरकर , कर्मचारी रमेश चव्हाण, अण्णा सावंत उपस्थित होते. कलमठ गावातील शेतकऱ्यांना यावर्षी वाडीवार भात बियाणे उपलब्ध झाल्याने ग्रामपंचायतचे आभार मानून उपक्रमाचे कौतुक केले. पुढील 3 दिवसात गावातील सर्व वाडीमध्ये भात बियाणे वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी