कर्जाच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

कर्जाच्या नैराश्यातून कणकवली बांधकरवाडी येथील अजय अभिमन्यू मोहिते (४३) यांनी सोमवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास राहत्या घरात सीलिंग फॅनला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची खबर त्यांचा मुलगा साईश मोहिते याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यांच्या पश्चात पत्नी व तीन मुलगे असा परिवार आहे.





