ओसरगाव तलाव गळती प्रतिबंधक कामाचा शुभारंभ

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 70 लाखांचा निधी मंजूर
कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघाचे आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगाव येथील धरणावर धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे या कामासाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर करून देण्यात आला. या कामाचा शुभारंभ सोमवारी आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आ. नितेश राणे यांनी ठेकेदार अनिल पवार यांना ३० मे पर्यंत काम पूर्ण करून द्या अशा सूचना दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच सुप्रिया कदम, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, ग्रामपंचायत सदस्य रिया नाईक, वंदना पारकर, राहुल आंगणे, पोलीस पाटील सौ. आंगणे, अर्जुन देसाई, सुदर्शन नाईक, गजानन तळेकर, रवी देसाई, रवी कावले, नाना परब, सुनील साटम, एड. विलास परब, प्रवीण नाईक, संतोष कदम, गणेश राणे, गणेश कदम, अक्षया राणे, प्रदीप राणे, संदेश राणे, प्रदीप तळेकर, परशुराम कारळेकर, नाथा नालंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





