खरीप हंगाम करिता, कुडाळ संघात मुबलक खते, बियाणे उपलब्ध

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेतकन्याना बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष भव्य जागेत बियाणे विक्री केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन संघाचे संचालक प्रसादभाई रेगे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व सर्व संचालक निलेश तेंडूलकर, महादेव परब, तुकाराम भोई, स्मिता तेरसे, वैशाली प्रभू, विजय प्रभु भास्कर परब, मोहन जाधव, विलास बुटाले, व्यवस्थापक नंदकिशोर करावडे, अकौंटंट संतोष राठीवडेकर, विभाग प्रमुख सतीश आंबेडोस्कर व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.


कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडे युरिया, सुफला १५:१५:१५, संपूर्णा १९:१९:१९ सम्राट १८:४६:०, कृषी उद्योग, म्युरेट ऑफ पोट्याश. १५:१५:१५:०९, १६:१६:१६, सिंगल सुपर फॉस्फेट पावडर, सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार, ही रासायनिक खते तसेच प्रोटोमिल, होटमिल, निम सम्राट, निम संपत्ती, निम पावडर इ.सेंद्रिय खते उपलब्ध आहेत.संघाकडे जया, सुवर्णा. कर्जत २. कर्जत ३, कर्जत ८. कर्जत ७. कर्जत ९.RTN 8, इतर बियाणे – कोमल, अमानी, किसान निधी, सोनम, सारथी, चिंटू, सुप्रीम सोना, 9090, दफ्तरी, शुभांगी, सोनम, जयश्रीराम, रुपाली, ६४४४. कावेरी २१, तृप्ती, साईराम, वैष्णवी, मीनाक्षी, १३१२, अमोघ अशी महाबीज व इतर कंपन्यांची बियाणे उपलब्ध आहेत.
शेतकऱ्यांनी खते, बियाणे संबंधी अधिक माहिती साठी दूरध्वनी क्र. ०२३६२-२२२३३४ व ९४२०२६१३३५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!