क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर तर सचिवपदी अभिजीत जैतापकर यांची निवड

खजिनदारपदी अनिल साखळकर तर उपाध्यक्षपदी शशिकांत पेडणेकर

सहसचिवपदी संकेत महाडिक आणि राहुल गोगटे

निलेश जोशी । कुडाळ : क्रेडाई सिंधुदुर्गची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर यांची तर सचिवपदी अभिजित जैतापकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच खजिनदारपदी अनिल साखळकर यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत पेडणेकर, सहसचिवपदी संकेत महाडिक आणि राहुल गोगटे यांची निवड करण्यात आली आहे.

क्रेडाई म्हणजे ” The Confederation of Real Estate Developers’ Associations of India” (CREDAI). हि संस्था indian Real Estate उद्योगाच प्रतिनिधित्व करते.क्रेडाई सिंधुदुर्ग मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचा समावेश होतो. या संस्थेची बैठक नुक्तीक कुडाळ येथे संपन्न झाली. यात या नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
मावळते अध्यक्ष प्रकाश जैतापकर यांनी गेली दहा वर्ष क्रेडाई सिंधुदुर्गचा कार्यभार सांभाळला आणि संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. या दहा वर्षात बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टींचा पाठपुरावा क्रेडाई सिंधुदुर्गने केला. यामध्ये बांधकाम नियमावली, FSI, पर्यटन नियमावली तसेच जिल्ह्यातील वाळू व गौण खनिज प्रश्न यांचा समावेश आहे. या कालावधीत मुंबई येथे तीन प्रॉपर्टी एक्स्पो भरवण्यात क्रेडाई सिंधुदुर्ग यशस्वी ठरली. कोविड काळात देखील क्रेडाई सिंधुदुर्गचे काम उल्लेखनीय राहिले आहे.
प्रकाश जैतापकर यांच्या यशस्वी वाटेवरच आमची वाटचाल सुरु राहील असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष गजानन कांदळगावकर आणि सचिव अभिजित जैतापकर यांनी केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, कुशल कामगार तयार करणे व कामगार सुरक्षा आणि बांधकाम व्यवसाय केंद्रास्थानी ठेवून जिल्ह्याची ब्रँड इमेज तयार करणे या त्रिसूत्रिवर आपला भर असेल असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीने केले.
यावेळी मावळते अध्यक्ष प्रकाश जैतापकर, सचिव अनिल साखळकर, माजी अध्यक्ष संजय पिंगुळकर,राज्य कार्यकारिणी सदस्य जीवन रेगे ,महेश अंधारी, श्रीकृष्ण केसरकर, संकेत नाईक, संकेत महाडिक, शेखर नाईक, प्रणव कामत , कुंदन केसरकर, सिद्धेश नाईक, अभय वालावलकर, ब्रिजेश कोठावळे, तन्मय माळगावकर,राहुल गोगटे, मनोज महाडीक,सुशील लोके उपस्थित होते. अनिल साखळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!