कणकवली तहसिलदार कार्यालया जवळ शॉर्ट सर्किटने आग

कणकवली नगरपंचायत च्या अग्निशामक बंबाला पाचारण
कणकवली तहसीलदार कार्यालयाजवळ माडाचे झावळ तारेवर पडून शॉर्ट सर्किट मुळे तेथील पालापाचोळा व प्लॅस्टिकच्या टाक्यांसह अन्य भागाला आग लागली. दरम्यान आग लागतात तेथील स्थानिकांनी नळाच्या पाण्याद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती मिळतात माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या सह स्थानिकांनी नगरपंचायत च्या अग्निशामक बंबा ला पाचारण केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली