संस्कारक्षम पीढी चांगल्या वाचनातूनच घडते – पराग नलावडे

रामेश्वर वाचनमंदिर येथे बालकुमार ज्ञानकोपराचा शुभारंभ

संस्कार मिळण्याचे काम पुस्तकातून होत असते.चांगल्या वाचनातूनच संस्कारक्षम पीढी घडणार आहे. यासाठीच मुलांनी वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन गेली पंधरा वर्ष बालवाचन संस्कृती वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पराग नलावडे यांनी रामेश्वर वाचनमंदिर आचरा येथे केले.यावेळी त्यांनी आपणास नोकरी सोडून व्यवसाय करण्याची ताकद या पुस्तकांच्या संस्कारातूनच मिळाल्याचे सांगितले.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन संस्कृत पासून दूर चाललेल्या उदयोन्मुख पिढीस वाचतकरावं, भविष्यातील वाचक तयार करणे, सार्वजनिक ग्रंथालयांची कार्यक्षमता वाढवावी याकरता शासन आदेशानुसार रामेश्वर वाचनमंदिर येथे बालकुमार ज्ञानकोपरा सुरु करण्यात आला. याचा शुभारंभ वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी योगदान देणारे पराग नलावडे, जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे,कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, दिपाली कावले,ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीच्या वर्षा सांबारी,कामिनी ढेकणे,भावना मुणगेकर, श्रद्धा महाजनी,कर्मचारी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यासह बहुसंख्य बालवाचक,पालक आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे औचित्य साधून बालसाहित्याच्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन लावून बाल साहित्याचा खजिनाच बाल वाचकांसमोर रिता केला गेला. संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजीभिसळे, पराग नलावडे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी मुलांना “वाचाल तर वाचाल “चे महत्व पटवून दिले.

आचरा – अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!