महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कसवण सोनारवाडी येथे सोलरलाईट लोकार्पण

राज ठाकरे यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेतर्फ महाराष्ट्र राज्य दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सोमवारी लिंग रवळनाथ मंदिर कमानी , व देवघर सोनारवाडी येथे लावण्यात आलेल्या सोलर लाईटचा लोकार्पण सोहळा, सरपंच सर्पे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी मुंबई मनसेचे सुनिल प्रभाकर सोनार , बाबु फर्नांडिस , स्थानिक ग्रामस्थ उदय सर्पे , गावकर, पोलीस पाटील विजय सावंत, दिलीप सोनार, चैतन्य सोनार, सुनिल सोनार, संतोष ओरसकर सर्व शिक्षक व विद्यार्थी आदिउपस्थित होते.सदर सोलर लाईट माजी सरपंच कै सिताराम सोनार यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश ज कदम यांच्या सहकार्याने उभारण्यात आले. मनसेतर्फे उभारण्यात आलेल्या या सोलरलाईट बद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहेत.

आचरा / अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!