आचरा येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

आचरा : पत्रकार सिद्धेश आचरेकर यांची कन्या ज्ञानदा हिच्या वाढदिवसानिमित्त आचरेकर परिवार व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिबिराचे आयोजन केल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी श्यामराव जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे सिद्धेश आचरेकर यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. कपिल मेस्त्री, पत्रकार अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत, सिंधू रक्तमित्रचे सचिव दत्ता पिंगुळकर, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. समाधान धुळगंडे, तंत्रज्ञ रुबिना मसलत, मयुरी शिंदे, नितीन गावकर, सुरेश डोंगरे, आरोग्य सेवक मनोज दूधवडकर, श्रीकृष्ण मेथर, गंगाराम वडर, गुरुनाथ शेटये, पळसंब उपसरपंच अविराज परब, दत्तात्रय लोकेगावकर, नितीन जाधव, स्वाती आचरेकर, अजित आचरेकर, संदेश आचरेकर, राजेश आचरेकर, हर्ष लोके, भुवन परब, मंदार सरजोशी, रोहित भिरवंडेकर, प्रणित काणेकर, तेजस निव्हेकर, अक्षय मालाडकर आदी उपस्थित होते.
आचरा / अर्जुन बापर्डेकर