कणकवलीतील आत्महत्या केलेल्या त्या तरुणाच्या व्हिडिओ मुळे अनेक अडचणी येण्याची शक्यता?

वैभववाडीत आज आत्महत्या केल्याचे झाले होते उघड
व्हिडिओ मुळे एकच खळबळ
कणकवलीतील एका तरुणाने वैभववाडी येथे आज आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यानंतर त्या तरुणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे या घटनेला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नसला तरी या व्हिडिओमुळे मात्र अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान त्या तरुणाने आत्महत्या करण्यामागे अन्य काही कारणे असल्याची चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने याबाबत उलट सुलट चर्चांना उत आला आहे.
दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग