राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा आमदार नितेश राणेंनी केला सत्कार

कणकवली नगरपंचायत चे यश जिल्ह्यात आदर्शवत

आमदार नितेश राणे यांचे गौरव उद्गार

कणकवली नगरपंचायत ने कर वसुली व विविध योजना उपक्रमांतर्गत नगरपालिका वर्गवारीत राज्यात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आज नगरपंचायत मध्ये भेट देत नगरपंचायत चे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या सहा सर्वच सत्ताधारी नगरसेवकांचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कणकवली नगरपंचायत ही नेहमीच सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत लोकाभिमुख कारभार करत असून नगरपंचायतने राज्यस्तरावर मिळवलेले यश हे निश्चितच जिल्ह्यातील इतर सर्वांना आदर्शवत ठरेल असे गौरव उद्गार नगराध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, चारू साटम, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!