जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलचे यश

कणकवली/मयूर ठाकूर
नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कु.गार्गी नारकर (इयत्ता आठवी ) हिने चौथा क्रमांक पटकावला आहे तर 14 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये कु. हसनेन शेख( इयत्ता सहावी ) हा दुसरा आला आहे तर कु. सैफ बटवाले (इयत्ता सहावी ) याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.कु.मनीष गुप्ता (इयत्ता सातवी) यांने चौथा क्रमांक पटकावला आहे 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तुभा शेख( इयत्ता नववी) ही चौथी आली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या त्यांच्या यशासाठी मलखांब प्रशिक्षक श्री कावले सर आणि श्री विचारे सर यांनी विशेष मेहनत घेतली आहे
या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी आणि प्रशिक्षकांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






