सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन पोलीस सुपुत्रांना कांस्यपदक

हैदराबाद रंगारेड्डी सीआरपीएफ पोलीस बँड कॉम्पिटिशन मध्ये मिळवले यश

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल व जनतेतून होतोय अभिनंदनचा वर्षाव

हैद्राबाद रंगा रेड्डी सीआरपीएफ कॅम्प येथे नुकत्याच पार पडलेल्या २७ व्या अखिल भारतीय पोलीस बँड कॉम्पिटिशन मध्ये सिंधुदुर्ग जिल्हातील सुपुत्र स्वस्तिक सुनील सावंत पोलीस हवालदार सिंधुदुर्ग पोलीस आणि जितेंद्र सुरेश सावंत पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस यांनी यश संपादन केले आहे. महाराष्ट्र संघात असलेल्या या दोघांना भारतातून कास्य पदक मिळाले आहे. स्वस्तिक सावंत हे कणकवली तालुक्यातील मूळ तरंदळे तर जितेंद्र सुरेश सावंत कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!