चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव

शहरातील गणपती साना परिसरातील श्री देवी चौंडेश्वरी मंदिरात ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. रविवार ११ रोजी सकाळी ९ वा. घटस्थापना, दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वा. दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण होईल. सायंकाळी ७.३०वा.आरती होईल. ११ ते १९ रोजी दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सोमवार १९ रोजी सायंकाळी ७ वा. देवीचा गोंधळ होईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






