बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या (१०) स्वरसंध्या

गायक अमल ठाकूर यांच्यासह नामवंत गायकांचा सहभाग
प्रति वर्षाप्रमाणे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमल ठाकूर यांच्यासह प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर हे गायक कलाकार विविध सदाबहार गीतांचे सादरीकरण करणार आहेत.. यासाठी ऑर्गन – मंदार जोशी, हार्मोनियम- आदित्य आचरेकर,पखवाज व तबला- रजत गाळवणकर, सिद्धेश कुंटे हे संगीत साथ करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व सहकाऱ्यानी केले आहे.






