साहित्याचे सच्चे पाईक झालात तर भाषेचे अभिजातपण टिकेल… डॉ. स‌ई लळीत

 एस. एम. उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्ञानपीठ व साहित्य अकादमी विजेत्या साहित्यकृतींच्या व साहित्यिकांच्या माहितीचे भित्तिपत्रक प्रदर्शन आणि 'अभिजात मराठी' या विषयावर कवयित्री व लेखिका डॉ. स‌ई लळीत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
    या भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ.लळीत मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य श्री. जी. एन. बोडके, अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीम. सुचिता गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सी.डी. हिर्लेकर, श्री. एम. एस. गुरव उपस्थित होते.
 प्राचार्य श्री. जी. एन. बोडके यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी भाषेचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना अभिजात मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर 'अभिजात मराठी' या व्याख्यानातून डॉ. सई लळीत यांनी अभिजात मराठीसाठीचा संघर्ष, त्यातील यश, निकषावर खरे उतरण्यासाठी अनेक साहित्यिक आणि तत्त्ववेत्त्यांनी दिलेले योगदान, ज्ञानेश्वर ते एकविसाव्या शतकातील साहित्यिक या सर्वांचा आढावा घेत मराठी भाषेचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व मराठी आणि मालवणी बोलीत अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांना कथन केले. विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची, लेखनाची आवड निर्माण व्हावी. 'साहित्याचे सच्चे पाईक झालात तरच हे अभिजातपण आपल्याला टिकवता येईल. तेव्हा तुम्हा विद्यार्थ्यांच्यांमधून साहित्यिक तयार व्हा. तुम्ही आमचे भविष्य आहात आणि त्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही  व्यक्त केली.
   कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. डी. एम. नलावडे चेअरमन डॉ.संदीप सावंत, शालेय समिती चेअरमन डॉ.एस. एन. तायशेटे, उपकार्याध्यक्ष श्री. एम‌ ए‌ काणेकर, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.प्रधान परिवेक्षक श्री. जी. ए.कदम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन श्रीम. एम आर पाटील मॅडम यांनी केले.आभार श्री एम आर प्रभू यांनी मानले.
error: Content is protected !!