शिवीगाळ करून दांड्याने मारहाण केल्याच्या आरोपातून विजय दत्ताराम परब वगैरे आठ जणांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपी तर्फे ॲड.राजेंद्र रावराणे व ॲड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद
७ डिसेंबर 2015 रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास वाजताच्या दरम्याने उपळे तालुका वैभववाडी येथील फिर्यादीच्या किराणा मालाच्या दुकानासमोर रवी रघुनाथ पालांडे, स्वप्निल सूर्यकांत पालांडे,चंद्रकांत रघुनाथ पालांडे, सौ मीना रघुनाथ पालांडे, सुनिता सूर्यकांत पालांडे,मनाली चंद्रकांत पालांडे, विजय दत्ताराम परब व चंद्रकांत ची पत्नी असे बेकायदा जमा करून घुसले व त्यांनी फिर्यादीस दुकानाबाहेर काढून जमीन जागेच्या भांडणा वरून उसाच्या दांड्यांनी व लाकडी दांड्याने पायावर व ठीक ठिकाणी मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मुलगा जयदीप पालांडे याला देखील मारहाण केली. व दोघांनाही ठार मारण्याची धमकी देऊन अर्वाचे भाषेत शिवीगाळ केली, अशी फिर्याद श्री विनय काशीराम पालांडे यांनी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिल्या वरून व नमूद केलेल्या आठ व्यक्तींविरुद्ध भादवी कलम 103 147,148,149, 427, 323, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर व्यक्तींना अटक करण्यात आली होती.तपासा अंती वैभववाडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र मान. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचे कोर्टात दाखल केलेले होते.
सदर केसची सुनावणी कणकवली फौजदारी न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांच्या जबान्या न्यायालयासमोर घेण्यात आल्या.
एकंदरीतच सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जमान्यांमध्ये असलेली विसंगती व त्रुटी तसेच आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये जमीन जागेवरून सुरू असलेल्या वाद व त्याच वाकडीहीतून देण्यात आलेली खोडसाळ फिर्याद,इत्यादी बाबी आरोपीतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, आरोपींतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची मे प्रथमवर्ग न्याय जनता अधिकारी कणकवली श्री शुभम लटूरिया यांनी निर्दोष मुक्तता केली.






