महिला शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

९ ऑक्टोबरला फोंडाघाट येथे विशेष संधी
जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांच्या पुढाकारातून आयोजन
महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी फोंडाघाट येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत सहकार्य मिळावे आणि आवश्यक कागदपत्रांसंदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.
परिसरातील जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






