आचऱ्याच्या ऋणानुबंधातील ‘नाना’

आचरेवासियांशी माणुसकीचे नातेजपणारा कलावंत
रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे नानांना श्रद्धांजली

सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. आचरे गावाशी नाळ जुळलेले ज्येष्ठ, रोखठोक आणि दिलदार अभिनेता आणि.सर्व स्तरातील लोकांशी प्रेमाने वागणारे नानांची आकस्मिक एक्झिट आचरेवासियांनाही हूरहूर लावून गेली. आचरे येथील रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरतर्फे गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘क्रांतिवीर’ मधला तो बुलंद आवाज, पडद्यावरचा दरारा आणि पडद्यामागचा साधा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण आचरा वासियांसाठी ‘नाना’ फक्त अभिनेता नव्हते, तर आपल्या मातीतला माणूस होते.

नानांनी आचरा दौऱ्यांमध्ये येथील विद्यार्थी, शेतकरी ,कष्टकरी मच्छिमारांशी थेट संवाद साधला होता.

आपण मोठा स्टार आहोत याचा लवलेशही न दाखवता, ते सामान्य माणसात मिसळायचे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे कार्य उभे केले, त्याची ओळख सिंधुदुर्गातील गावागावात आहे.

२०१६ मध्ये आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या शतक महोत्सवाला नाना पाटेकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी तब्बल दोन तास त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि अनुभव सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.
त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत माणसे आणि त्यांची मने वाचण्याचे महत्त्वही पटवून दिले होते.

प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही आचऱ्यात नाना कधीही सुपर स्टार’ च्या तो-यात वावरले नाहीत म्हणूनच ते सर्वांना आपलेसे वाटत. मित्र राजीव सावंत यांच्या घरी ते साध्या पद्धतीने येत. टूव्हिलरवरुन गावात सहज फेरफटका मारणारा, आठवडा बाजारात साध्या कपड्यात खरेदी साठी वावरणारा नाना’ सर्वांना आपलासा वाटायचा.

आचऱ्याचे ग्रामदैवत इनामदार श्रीदेव रामेश्वर आणि त्याचे ऐतिहासिक मंदिर याबद्दल नाना पाटेकरांना विशेष आकर्षण होते. मंदिरात दर्शनासाठी येणारे नाना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या रामेश्वर सार्वजनिक वाचनालयासहि भेट देवून मन लावून पुस्तक वाचणा-या बालवाचकांनाहि प्रोत्साहित करत.

नाना पाटेकर स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते.त्यांचा प्रत्येक शब्द मार्गदर्शकच होता. प्रत्येक संवादातून स्वाभिमान आणि माणुसकीचा संदेश मिळत असे. त्यांनी विद्यार्थ्यांना दीन होऊन कोणासमोरही हात न पसरता आपल्या कष्टातून उभे राहण्याचा सल्ला दिला. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यापासून ते प्रसिद्ध अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास, नाट्यक्षेत्रातील संघर्ष, मित्रांची साथ आणि सामाजिक कार्यातील अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मोकळेपणाने मांडले होते.

आज नाना पाटेकर आपल्यात नसले तरी आचऱ्यातील त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील. दुचाकीवरून गावात सहज फेरफटका मारणारा, बाजारात भाजी घेताना दिसणारा, विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधणारा आणि गावाच्या विकासाची स्वप्ने पाहणारा ‘नाना’ आचऱ्याच्या स्मरणात कायम राहणार आहे.

आचऱ्याशी मनापासून नाळ जोडणाऱ्या या कलावंताला आचरेवासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. नाना गेले, पण आचऱ्याच्या आठवणीतला ‘नाना’ कधीच जाणार

आचरा गाव नानांना नेहमीच आपल्या आठवणीत ठेवेल. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!