1961 पूर्वी चा वास्तव पुरावा रद्द करा

धनगर समाजाचे नेते लक्ष्मण शेळके यांची मागणी

जातीचा दाखला मिळण्यासाठी 1961 पूर्वी वास्तव असलेला पुरावा महाराष्ट्रात मागितला जातो तो रद्द करून यापुढे 1990 च्या दरम्यानचा पुरावा जातीचा दाखला देताना मागण्यात यावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव शेळके यांनी केली आहे.
आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून शासन स्तरावर याची तळ लावण्यात यावी असे आवाहन केले आहे.
धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव शेळके यांनी या निवेदनात म्हटले आहे की धनगर समाजाला भटक्या जमाती सवलती 1990 ला लागू करण्यात आल्या त्यावेळी जाचक अटी लावण्यात आल्या होत्या त्यापैकी एक अट म्हणजे जातीचा दाखला काढण्यासाठी महाराष्ट्रात 1961 पूर्वी वास्तव असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक मानले गेले परंतु आता या गोष्टीला 30 ते 32 वर्षे उलटली मात्र 1961 चा पुरावा यामध्ये कोणताही बदल झाला नाही. महाराष्ट्रातील सध्याचे मानवी आयुर्मान 70 ते 75 वर्षांपर्यंत येऊन ठेपलेले असताना यापुढे धनगर समाजाला 1961 चा पुरावा मिळणे फार अवघड होणार आहे. त्यामुळे ही जाचक अट काढून टाकण्यात यावी यापुढे किमान 1990 दरम्यान पुरावा आवश्यक ठेवल्यास समाजास जातीचे दाखले काढणे थोडेफार सुलभ होऊ शकणार आहे. धनगर समाजातून अत्यंत तीव्रपणे ही मागणी होत असून याची शासनाने सत्वर दखल घ्यावी.

वैभववाडी ब्यूंरो न्यूज

error: Content is protected !!