स्वर्गीय बुवा कै.समीर रामा कदम यांच्या स्मरणार्थ रविवारी शोकसभा.

सर्व भजनी कलाकार,भजन प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे आवाहन.
शोकसभेस उपस्थित राहून स्वर्गीय बुवा कै.समीर कदम यांच्या कुटुंबाला स्वेच्छेने आर्थिक मदत करा – बुवा श्री.संतोष कानडे
कणकवली : मयूर ठाकूर कोकणातील भजन क्षेत्रातील एक गोड गळ्याचे भजनी बुवा म्हणून परिचित असलेले स्वर्गीय बुवा कै.समीर रामा कदम यांच्या निधनाने भजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने भजन क्षेत्रातील कलाकार,रसिक आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कै.समीर रामा कदम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही शोकसभा रविवार,दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.शोकसभा राधाकृष्ण मंगल कार्यालय, लांजेवाडी,कलमठ,ता. कणकवली,जि.सिंधुदुर्ग येथे होणार असून
भजन क्षेत्रातील कलाकार,रसिक तसेच कै.समीर कदम यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी आणि ज्या व्यक्तींना कै. समीर कदम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे अश्या सर्वांनी उपस्थित राहून मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.






