आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये श्रावण धारा सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न

कणकवली:मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेचा आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे तसेच डॉ.राजअहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या श्रावणधारा या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे नुकतीच पार पडली
गेली दहा वर्ष सातत्याने घेतल्या जाणाऱ्या या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत यावर्षी सुद्धा जिल्हाभरातून स्पर्धकांचा प्राथमिक फेरीसाठी उदंड असा प्रतिसाद लाभला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि डॉ. राजअहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुकचे अध्यक्ष बुलंद पटेल सर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर सर,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम त्याचप्रमाणे प्राथमिक परीक्षा साठी लाभलेले परीक्षक श्री संदीप तेंडुलकर, श्री श्रीधर पाचंगे आणि श्री हर्ष नकाशे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवरांचे तसेच कोकण नाऊ चे प्रतिनिधी मयूर ठाकूर आणि स्पर्धक प्रतिनिधी पालक प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर वय वर्ष 11 ते 14 लहान गट,वय वर्ष 15 ते 19 मोठा गट,आणि आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही प्राथमिक फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली सर्व प्राथमिक फेरीतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला या स्पर्धेची अंतिम फेरी 29 ऑगस्ट 2026 रोजी आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे या ठिकाणी संपन्न होणार आहे.

error: Content is protected !!