राजस्थान नगरपालिका निवडणुकी करिता आमदार प्रमोद जठार यांची भाजपा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती

महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक पदांवर प्रमोद जठार यांनी केले आहे विशेष काम
राजस्थान मधील नगरपालिका निवडणुकीत करिता भरतपूर नगरपरिषद साठी भाजपाचे महाराष्ट्रातील विधान परिषदेचे कोकण विभागाचे आमदार प्रमोद जठार यांची पक्षाकडून पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या निवडणुकीकरिता पक्ष निरीक्षक आहेत. आमदार प्रमोद जठार यांनी पक्षाच्या अनेक स्तरांवर प्रभावीपणे काम केले असून, महाराष्ट्र मध्ये प्रदेश सह अन्य अनेक पातळीवर प्रमोद जठार यांनी पक्ष संघटना वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भाजपा पक्ष प्रवक्ते म्हणून देखील प्रभावीपणे बाजू माध्यमां समोर मांडली आहे. पक्ष संघटनेचा असलेला अनुभव व पक्षासाठी त्यांनी केलेले काम याची दखल घेत त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.






