जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे ची चमकदार कामगिरी

कणकवली:मयूर ठाकूर
सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच ओरोस इथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केला आहे.
या स्पर्धेत ज्यूनियर मुलीच्या गटात ट्रॅडिशनल या प्रकारामध्ये कु.हर्षिता अजित सावंत हिने गोल्ड मेडल प्राप्त केले तर कु.तमन्ना आसिफ पटेल हिने सिल्वर मेडल तर गिरीजा मंगेश मोहिते हिने ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. ज्यूनियर मुलांच्या गटामध्ये कु.आयुष अवधूत बागवे याने ट्रॅडिशनल या प्रकारात गोल्ड मेडल मिळवले आहे. ट्रॅडिशनल प्रकारात सब ज्युनिअर मुलींच्या गटात कु.सिद्धी हरी ओम प्रसाद हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. सब ज्युनिअर मुलांच्या गटामध्ये कु.हितेश महेश डिचोलकर याने ट्रॅडिशनल प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त केले, कु भावेश धोंडी घाडीगावकर याने ब्रॉन्झ मेडल मिळवले तर याच प्रकारात कश्यप विजय वातकर याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे.
रिदमिक पेअर मुली या प्रकारामध्ये शिफा बुलंद पटेल आणि तुबा अयाज शेख यांनी गोल्ड मेडल पटकावले आहे.आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात मुलींमध्ये कु.गिरीजा मंगेश मोहिते हिने प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावला आहे तर आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात मुलांमधून कु.आयुष्य अवधूत बागवे याने प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे ज्यूनियर मुलांमध्ये रिदमिक पेअर मुलींच्या प्रकारात कु.गिरिजा मंगेश मोहिते आणि कु.तमन्ना आसिफ पटेल यांनी प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे. एकूणच या योगासन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहा गोल्ड, दोन सिल्वर, तर दोन ब्राँझ मेडलची कमाई करत आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे . या यशामध्ये आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या योगा शिक्षिका सौ.श्वेता गावडे मॅडम यांचे सर्व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल त्यांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर,आयडीयल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गामधून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.






