पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल ची एन्ट्री होणार

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

आजचा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांमधून अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल साकारणार आहे. त्याकरिताचा करार आज पूर्ण झाला असून गेल्या 32 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. या ऐतिहासिक व आजच्या दिवशी सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा दिवस सिंधुदुर्ग जिल्हा वासियांच्या यांच्या मनात कोरला जाणार आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. अशी माहिती भाजपाचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल करण्याबाबत मंत्रालयात त्रिपक्षीय करार संपन्न झाला.ताज प्रशासन,राज्य सरकार आणि शिरोडा-वेळागर स्थानिक मंडळात हा करार पार पडला.शिरोडा-वेळागर येथे हे पंचतारांकित हॉटेल होणार आहे.खरतर आजचा दिवस हा सिंधुदुर्गसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे.कारण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषीत झाल्यापासून अनेक वर्षे झाली.आम्हाला हा नेहमी कागदावरचाच पर्यटन जिल्हा वाटत आलाय. पण आता प्रत्यक्षात केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणी करण्याचे धारिष्ट व किमया पालकमंत्री नितेश राणेंनी साकारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगार सहित एक उच्च दर्जाची पर्यटन सुविधा देखील या निमित्ताने जिल्ह्यात आता निर्माण होत आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानत असल्याचे मिलिंद मेस्त्री यांनी सांगितले.

error: Content is protected !!