कणकवली नगरपंचायतीतर्फे ‘एकल महिला सर्वेक्षण’

१८ ते २८ ऑगस्ट दरम्यान नोंदणी

महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या चौथ्या महिला धोरणांतर्गत कणकवली नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिलांनी दि. १८ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपली नोंदणी करावी, असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी अर्ज नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी नगरपंचायत कार्यालयातील तळमजल्यावरील DJSY विभाग (महिला व बालकल्याण विभाग) यांच्याशी संपर्क साधावा.
नोंदणीसाठी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.

error: Content is protected !!