कणकवली -आचरा मार्गांवरील खड्डे धोकादायक

सरपंच संदिप मेस्त्री यांनी वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष

कणकवली आचरा मार्गावर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी या संदर्भात कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांचे लक्ष वेधले. आज सार्वजनिक बांधकामचे अभियंता महेश गांगुर्डे यांनी कलमठ येथे सरपंच संदिप मेस्त्री यांच्या समवेत रस्ता पाहणी करून देखबाल दुरुस्ती ठेकेदार नितीश पवार यांना खड्डे बुजवणे, रस्त्यावरील पाणी निचरा करणे, ग्रास कटिंग करणे या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होण्याच्या दृष्टीने काम करण्याची मागणी सरपंच संदीप मेस्त्री यांनी केली

error: Content is protected !!