बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या नीरजा पवारची राज्यस्तरीय बॅडमिंटन संघात निवड

कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनी कु. नीरजा राजेश पवार हिने अकोला येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत ९ वर्षांखालील एकेरी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपली निवड सार्थ ठरवली.
YONEX-SUNRISE GH RAISONI MEMORIALच्या वतीने ५ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अकोला येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नीरजाने या स्पर्धेत आत्मविश्वासपूर्ण आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करीत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. विशेष म्हणजे ९ वर्षांखालील मुलांचा संघ राज्यस्तरापर्यंतच मर्यादित असतो.
नीरजाच्या या यशामागे तिची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि कौशल्यासोबतच आई-वडिलांचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वाचे ठरले. तसेच पी.ई. शिक्षक रोहिदास राणे आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन तिला लाभले.
नीरजाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर तसेच सर्व शिक्षकवृंदाने तिचे अभिनंदन केले. तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

error: Content is protected !!