जमीन खरेदी प्रकरणात जाचक अटींचे परिपत्रक रद्द करा

वकील संघटनेच्या वतीने पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जमिन खरेदी प्रकरणी शेतकरी दाखला जोडणे/पडताळणी करणे आवश्यक असल्याबाबत जारी केलेली परिपत्रके कायद्याच्या विपरीत असल्याने रद्द करण्यात यावी अशी मागणी वकील संघटनेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अधिवक्ता प्रकाश बोडस अधिवक्ता राहूल तांबोळकर अधिवक्ता अभिषेक गोगटे अधिवक्ता समीर गवाणकर अधिवक्ता प्रसाद करंदीकर अधिवक्ता रुपेश राणे अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर अधिवक्ता अविनाश पाटकर अधिवक्ता विशाल देवगडकर अधिवक्ता अनुराग बापट अधिवक्ता मकरंद नातू आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी विषय समजावून घेतला व मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे सांगून जिल्हाधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याविषयी सांगितले.






