आचरा ग्रामपंचायत व मॅनेजमेंट स्टडीज महाविदयालययांच्या सहकार्याने आचरा समुद्र किनारी स्वच्छता मोहिम

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत आज आचरा पिरावाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान आणि जनजागृती मोहीम

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत आज आचरा पिरावाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान आणि जनजागृती मोहीम आचरा ग्रामपंचायत व मॅनेजमेंट स्टडीज महाविदयालय आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली
यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले ग्रा. पं सदस्य मुजफ्फर मुजावर पूर्वा तारी पिरावाडी पोलीस पाटील तन्वी जोशी तसेच होमगार्ड, आचरा मॅनेजमेंट स्टडी चे प्राचार्य नितेश सारंग, सहशिक्षक प्रियांका हिंदळेकर ,भावना मुणगेकर आराध्या बागवे प्राजक्ता त्रिंबक कर निशिकांत कमळे आदीं उपस्थित होते यावेळी आचरा महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक विद्यार्थी आणि ग्रामपंचायत आचरा यांनी समुद्रकिनारा स्वच्छता करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन व प्लास्टिक मुक्त परिसर याबाबत जनजागृती केली या मोहिमेत सुमारे दिडशे किलो कचरा गोळा करण्यात आला.

error: Content is protected !!