खारेपाटण शहरातील प्रमुख विकासकामांसाठी मंगेश गुरव यांनी पालकमंत्री नितेश राणे व आम.निलेश राणे यांची घेतली भेट

खारेपाटण शहरातील विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, खड्डेमय रस्त्यावर साचलेल्या चिखलातून शालेय विद्यार्थी पालक नागरिक यांना होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन विविध विकासकामांचे निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये खारेपाटण शहरातील प्रमुख विकासकामांचा समावेश आहे—

  1. खारेपाटण स्मशानभूमी रस्त्याचे ५०० मीटर डांबरीकरण तसेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे.
  2. हायवे ते खारेपाटण बस स्थानक रस्त्याचे ५०० मीटर उंचीकरण व काँक्रीटीकरण करणे.
  3. पोस्ट ऑफिस ते जिल्हा परिषद केंद्र शाळा रस्त्याचे ५०० मीटर डांबरीकरण करणे.
  4. खारेपाटण घोडे पाथर बंदराचे सुशोभीकरण करणे.
  5. खारेपाटण बस स्थानक ते पोस्ट ऑफिस रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच भुयारी गटार व्यवस्था करणे.
    यावेळी खारेपाटण शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकमंत्री नीतेशजी राणे व आमदार निलेशजी राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विकासकामांना प्राधान्य देऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी मंजूर करण्याचे सकारात्मक आश्वासन यावेळी देण्यात आले.
    खारेपाटण शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधा व शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी सांगितले.
error: Content is protected !!