शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे नेत्रदीपक यश

कणकवली/मयूर ठाकूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7 वी या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
यामध्ये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विभागात कु .चिन्मय उदय राणे हा ग्रामीण सर्वसाधारण मधून तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला, तसेच कु. शाश्वत तांबे याने जिल्ह्यात 46 वा क्रमांक प्राप्त केला .
या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर ,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर, कोषाध्यक्ष शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर, आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम, यांनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.






