प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे सीपीएचसी प्रशिक्षण संपन्न

सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा येथे संपन्न झाले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ, डॉ.सुधीर धनगे ,डॉ.जुवेरिया मुजावरवैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र आचरा ,आरोग्य सहाय्यक संजय नाईक, आरोग्य सहाय्यक .नित्यानंद भगत,गटप्रवर्तक चारुशीला गावकर, भावना राठोड,तसेच इतर सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) स्तरावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या CPHC अंतर्गत 13 प्रकारच्या सर्वसमावेशक आरोग्य सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये गर्भावस्था व प्रसूतीदरम्यानची सेवा, नवजात व अर्भक आरोग्य सेवा, बाल व किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य सेवा, संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, सामान्य तीव्र व किरकोळ आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य आजारांचे (NCDs) स्क्रीनिंग व व्यवस्थापन, सामान्य नेत्र व ENT सेवा, मूलभूत मौखिक आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिक व पॅलिएटिव्ह आरोग्य सेवा, भाजणे व दुखापतींसह आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य समस्यांचे स्क्रीनिंग व प्राथमिक व्यवस्थापन तसेच योग व आयुष सेवा यांचा समावेश आहे.
प्रशिक्षणादरम्यान वरील सेवांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णांची तपासणी, आवश्यक उपकरणांचा वापर तसेच विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शनासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली.
प्रशिक्षणास समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी, आशा आरोग्य कर्मचारी, परिचारिका व इतर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत होऊन नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सुलभ व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास अधिक बळकटी मिळणार आहे.

error: Content is protected !!