आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर रस्त्याच्या कामाचे गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

नागवे येथील गेली अनेक वर्ष मागणी असलेले काम लागणार मार्गी
आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून कणकवली तालुक्यातील नागवे महापुरुष मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण या कामाचे भुमिजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी नागवे सरपंच सौ सिध्दीका जाधव,उपसरपंच महेन्द्र कुडाळकर, ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर,ग्रामपंचायत सदस्य बबन तायशेटे, बाबा मोरये, स्वप्नील पाताडे, काका सातवसे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी