कुडाळमध्ये पोलिसांची डंपरवर कारवाई

…. आता केवळ दंडात्मक, प्रसंगी कठोर कारवाई अटळ

कुडाळ : कुडाळ पोलिसांनी आज दुपारी १२ च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचा बडगा उचलला. कुडाळ पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. जवळपास वाळू वाहतूक करणाऱ्या १३ डंपरवर ही कारवाई करण्यात आली. याबाबत कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी डंपर चालकांना समज देताना स्पष्ट केले की, आता केवळ दंडात्मक कारवाई केली असून भविष्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.
तसेच डंपरचालकांनी पुढील वाहतूक नियोजन होईपर्यंत आपली वाहने पिंगुळी मठ मार्गेच गणेश मंदिर मार्गस्थ करावी अशा सूचनाही दिल्या आहेत.
मागील काही दिवसात कुडाळ आणि मालवण या भागात वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये झाराप झिरो पॉईंट येथे झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीवही गमवावा लागला होता. मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना रोखा, असा इशारा दिला होता. त्यानंतर कुडाळ पोलीस प्रशासनाने आज ही मोठी कारवाई केली आहे. भविष्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. सदर कारवाई पोलिस श्याम भगत, पोलिस मयूर सावंत, पोलिस धुमाळे यांच्या टीमने केली.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!