‘पॉक्सो’ गुन्ह्यातून कुडाळमधील आरोपीची निर्दोष मुक्तता

अॅड. राजीव बिले यांचा युक्तिवाद

बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा 2012 चे कलम4(2),8 व भारतीय दंड संहिता 1860चे कलम373-3,376-2J,506 अंतर्गत दाखल असलेल्या एका गंभीर प्रकरणात पुराव्यांअभावी कुडाळ येथील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.एस.देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
या बाबत ऍड. दत्ताराम बिले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात पॉक्सो व भारतीय दंड संहिता 1860 चे कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात पार पडली असता सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये आणि साक्षीदारांच्या जबाबात असलेली विसंगती व बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत आरोपीविरुद्धचा सिद्ध होत नसल्याचे पटवून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्ष आणि सादर केलेले पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत आरोपीच्या वतीने अॅड. राजीव दत्ताराम बिले, अॅड. दत्ताराम राजीव बिले, अॅड. हेमांगी वराडकर आणि अॅड. तेजस सावंत यांनी कायदेशीर बाजू मांडली.

error: Content is protected !!