भाजपाचे आमदार प्रमोद जठार ठाकरे सेनेच्या देवीच्या दर्शनाला

राजकारण बाजूला ठेवत प्रमोद जठार यांनी घेतले त दुर्गादेवीचे दर्शन

ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार प्रमोद जठार यांचे स्वागत

भाजपाचे कोकण विभागाचे आमदार यांनी ठाकरे सेनेच्या दुर्गादेवीचे कणकवलीत दर्शन घेतले. एकीकडे भाजपा विरोधात राज्य व देशभरात विरोधी पक्षाने आरोप करत राळ उडवून दिलेली असताना मात्र या राजकारणाचा या धार्मिक कार्यक्रमांमध्ये लवलेश न दाखवता आमदार प्रमोद जठार हे स्वतः ठाकरे सेनेच्या दुर्गादेवीच्या दर्शनासाठी गेले. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यानी देखील त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत नीरजा जठार, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके नगरसेवक संकेत नाईक उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये हर्षद गावडे यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!