कुडाळमध्ये १६ जुलै पासून मच्छर विरोधी जंतुनाशक फवारणी मोहिम

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार

सध्या कुडाळ शहरात डास आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना वेळीच आळा बसावा, या सामाजिक भावनेतून नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या सौजन्याने संपूर्ण कुडाळ शहरात जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी (मच्छर फवारणी) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ गुरुवारी १६ जुलै पासून सांगिर्डेवाडी येथून करण्यात येणार आहे. .
गेल्या काही दिवसांपासून शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत होती. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत, मंदार शिरसाट यांनी स्वखर्चाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत कुडाळ शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गल्ल्या, कचरा डेपो, साचलेली गटारे आणि रहिवासी वसाहतींमध्ये फॉगिंग मशीनद्वारे (धूर फवारणी) या मोहिमेचा शुभारंभ करताना मंदार शिरसाट म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. पावसाळ्यानंतर आणि बदलत्या हवामानामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
एक नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे, याच भावनेतून आम्ही ही फवारणी सुरू केली आहे. शहरातील एकही कोपरा फवारणीविना राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. “या मोहिमेची सुरुवात सांगिर्डेवाडी येथे गुरुवारी १६ जुलै रोजी होणार असून विविध प्रभागांमध्ये ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, नागरिकांनी देखील आपल्या घराभोवती पाणी साचू न देता स्वच्छता राखण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. मंदार शिरसाट यांच्या या स्तुत्य आणि जनहितार्थ उपक्रमाबद्दल कुडाळ शहरवासीयांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!