कुडाळच्या प्रवेशद्वारांना नामवंतांची नावे द्या

सतीश वर्दम यांचे नगर पंचायतीला निवेदन
कुडाळ शहरात होऊन गेलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तींची नावे शहराच्या प्रवेशद्वारांना द्यावीत अशी मागणी सतीश वर्दम यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडे दिले.
सतीश वर्दम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ शहरामध्ये कला क्षेत्रातिल भिष्माचार्य फिल्म इंडस्ट्रीज मध्ये अधिराज्य गाजवणारे सुप्रसिध्द रंगभुषाकार कै. बाबा वर्दम, संगितकार कै वसंत देसाई, पहिले सरपंच कै. बाबा भोगटे, साहित्यिक कै. चिं. त्र्यं. खानोलकर असे अनेक दिग्गज होऊन गेलेत. त्यांची नवे कुडाळच्या प्रवेशव्दारास द्यावीत आणि त्यांच्या स्मृती जपाव्यात अशी मागणी सतीश वर्दम यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे उपस्थित होते.






