श्री साई सेवा मंडळ आचरा तर्फे साई चरित्र अखंड पारायण वाचनास उत्साहात सुरुवात

आचरा देवूळवाडी येथील गुळगुळे यांच्या घाटीवरील दत्त मंदिरात शनिवार सकाळी ११ नंतर मंदार सांबारी यांच्या घरून वाजतगाजत साईबाबांची मुर्ती आणून तीची मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतरच मोठ्या उत्साहात
अखंड साईचरीत्र वाचनास सुरुवात झाली.दोन दिवस चालणा-या या सोहळ्यात रविवारी दुपारी अखंड पारायण वाचन समाप्ती नंतर आरती, महाप्रसाद,सायंकाळी साडेपाच वाजता काकड आरती मंडळाचे भजन,7.30वाजता शिवरामेश्वर भजन मंडळाचे भजन तर रात्रौ 9.30 वाजता माऊली वारकरी दिंडी भजन मंडळ मोर्वे यांचे दिंडी भजन होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!