कलमठ गावाला ४१ घरकुले मंजूर.ग्रामपंचायत पाठपुराव्याला यश

सर्वं घरे लवकर पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणार – सरपंच संदिप मेस्त्री
कलमठ गावातील बेघर लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजेना मधून पून्हा एकदा नवीन आर्थिक वर्षात ४१ घरकुल मंजूर झाली असून आज ग्रामपंचायत मासिक बैठकित घरकुल मंजूर लाभार्थी यादी चे वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतने गेल्या वर्षी बेघर आणी भूमिहीन गरजू लाभार्थ्यांसाठी एकत्रित घरकुल प्रकल्प पूर्ण केला असून पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन योजनेतून जमीन साठी देखील अनुदान प्राप्त केले होते. यावर्षी देखील प्रधानमंत्री आवास योजना मधून नव्याने मंजूर झालेली घरकुले, भूमिहीन असलेल्या लाभार्थीना जमिनीसाठी लवकर प्रस्ताव करून पूर्णत्वास नेऊ असा विश्वास सरपंच संदिप मेस्त्री यांनी व्यक्त केला असून गावाच्या वतीने प्रधानमंत्री नरेद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.यावेळी उपसरपंच रवींद्र यादव, स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर, नितीन पवार, हेलन कांबळे, सचिन खोचरे, स्वाती नारकर, प्रियाली आचरेकर,श्रेयस चिंदरकर उपस्थित होते.






