मंदिराची घंटा चोरी करणाऱ्यांना वैभव नाईक यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही!

युवा सेना शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांचा टोला

वैभव नाईक याप्रमुखर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा, असा जोरदार पलटवार युवासेना शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी केला.
“विजय इंगळे यांनी निष्ठेच्या गोष्टी करण्यापूर्वी स्वतःची निष्ठा तपासावी. घंटा चोरांनी निष्ठेचे धडे देऊ नयेत,” असा टोला मेस्त्री यांनी लगावला.

नीलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीत 2014 आणि 2019 मध्ये जनतेने नाकारले, याची आठवण करून देत, “दुसऱ्यांच्या जनाधारावर प्रश्न उपस्थित करण्याआधी स्वतःच्या राजकीय कामगिरीचा हिशेब द्या,” असे आव्हान त्यांनी दिले.

“गुंडागर्दीची भाषा वापरली तर आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक दादागिरीला जशाच तसे उत्तर दिले जाईल. आरोपांपेक्षा कामावर बोला आणि जनतेचा विश्वास मिळवा! अशी टिका कलमठ युवासेना शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी केली आहे.

error: Content is protected !!