कॅसिनो ची मैत्री अखेर भल्या पहाटे कानाखाली “अंधार” काढे पर्यंत ताणली
कणकवली शहरातील भल्या पहाटेची घटना चर्चेचा विषय
कॅसिनोत गेल्यावर “त्या” एका मुळेच सलग होणाऱ्या हारी मुळे त्रस्त झालेल्या कणकवली मधील एकाने कॅसीनेतून मागे येताना समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील त्या आपल्या सहकारी मित्राला टॉर्चर केले. पण त्याचे झाले उलट आणि हे टॉर्चर करणे अंगाशी येत अखेर त्याच्या कानाखालीच अंधार काढला. कॅसिनो मधून आल्यानंतर कणकवलीतील एका गजबजलेल्या चौकात ही घटना घडल्याचे समजते. परंतु अखेर सगळे आपसातलेच असल्यामुळे या विषयावर पडदा पडला. उपलब्ध माहितीनुसार कणकवलीतील हे तिघे व समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील एक असे चौघे त्याच्या गाडीने कॅसिनो मध्ये पैसे गमावून परतले. तिकडून येत असताना त्या तालुक्यातील मित्राला सोबत घेतल्याने सातत्याने हार होते असा सूर त्यातील एकाने सुरुवातीपासूनच लावला. या सातत्याने सुरू असलेल्या टॉर्चर मुळे संतापलेल्या त्या दुसऱ्या तालुक्यातील सहकाऱ्याने कानाखालीच “अंधार” काढला. पण अखेर आपसात या विषयावर पडदा टाकला. परंतु कणकवलीत याची दिवसभर चर्चा सुरू आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली






