कणकवली पत्रकार संघाच्यावतीने ४ जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल गुणगौरव कार्यक्रम ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती कणकवली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषद प्रतिनीधी गणेश जेठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी पत्रकार पाल्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तु देवून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव केला जाणार आहे. तरी सर्व पत्रकार संघ सभासदांच्या गुणवंत पाल्यांनी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे यांनी केले आहे.






