महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिचें अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी शंकर उर्फ योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव-वेताळटेंब) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

योगेश चव्हाण याने फिर्यादी महिलेचा १ मार्च २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध पाठलाग केला. एका चेंजिंग रुममध्ये लगट केली तसेच तीला अश्लिल फोटो व व्हिडीओ बघण्यास भाग पाडले. तसेच त्यादिवशी रात्री तीच्या घरी पाठीमागील दरवाजाने जाऊन जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार आरोपीने शारिरीक संबंध ठेऊन एकेदिवशी तिचे नकळत अश्लील चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. याबाबत महिलेच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तीला पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार कुडाळ पोलीस स्टेशन येथे भान्यासं कलम ६४, ७४, ७५ आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करून ३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. आरोपी ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडीत होता. त्यानंतर दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर करताना आरोपीने कुडळ पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, पिडीत महिला व साक्षीदारांशी संपर्क न ठेवणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!