श्रावणसरी बहरल्या, मिळून साऱ्याजणी फुगडीच्या तालावर रंगल्या!

मिळून साऱ्याजणी महिला मंचातर्फे उस्फूर्त कार्यक्रमांचे आयोजन

महिला वर्गाची मोठी उपस्थिती

मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली, आयोजित श्रावणसरी कार्यक्रम शिवशक्ती हॉल कणकवली येथे महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाला.
प्रसिद्ध महिला दशावतार, राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त मालवणी नटसम्राज्ञी माननीय अक्षता कांबळी आणि मिळून सार्‍याजणी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी पारंपरिक फुगड्या घालण्यात आल्या. फुगड्यांचे विविध प्रकार, खेळ तसेच उखाणे घेण्यात आली.
फुगड्या आणि आधुनिक व्यायाम यावर महिला समुपदेशन केंद्राच्या रोमा खडपकर यांनी मार्गदर्शन केले. .
यावेळी भाग्यश्री रासम, रोहिणी पिळणकर , नीता मयेकर, अंजू घवाळी , सुखदा गांधी, अमिता सावंत, श्वेता घाणेकर, संजना साटम, रीमा साटम, सुमेधा काणेकर, श्वेता उचले, सुप्रिया सरंगले, सुविधा राणे, जिजाबाई मेस्त्री, गौरी पिळणकर,शितल चव्हाण, दिव्या साळगावकर,प्राची गायकवाड,वैशाली केळुसकर, समीक्षा गुरव, मीनल चव्हाण, गीता पिळणकर, शारदा पिळणकर, मीनल मर्गज, विद्या कोरगावकर, मनीषा मिठबावकर, गीता डावरे,स्मिता भोसले,अलका गाड, शिवानी विचारे, संध्या नारकर, चैताली मोर्ये, श्रावणी कोकरे, सुनीता पाटील, मंजिरी वारे,सुचिता गावडे, अक्षता मेस्त्री,आरती मेस्त्री, सुहासिनी कुलकर्णी, स्नेहलता सावंत,अविता डावरे, ज्योती मुणगेकर, नीलम सावंत, नंदा गावडे, स्वाती सुतार,प्राची पारकर तसेच कणकवली शहर आणि शहरा नजीकच्या गावातील अनेक महिला श्रावण सरी कार्यक्रमात सहभागी होऊन फुगड्यांची रंगत वाढवली.

error: Content is protected !!