सोशल मिडिया वापरताना सावधगिरी बाळगा–सपोउनि मिनाक्षी देसाई

सायबर सुरक्षेबाबत आचरा पोलीस स्टेशन तर्फे शाळांमध्ये जनजागृती

मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरत आहे अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये संशयास्पद लिंक ओपन करू नये वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती कोणाला देऊ नये सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तातडीने 1930 हेल्पलाइनला किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन आचरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई यांनी न्यू इंग्लिश आचरा येथे केले .यावेळी त्यांनी अमली पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी अमली पदार्थां पासून दूर राहण्याचे आवाहन केले यावेळी त्यांच्यासोबत आचरा हायस्कूल चे मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, उपमुख्याध्यापक मधुरा माणगांवकर,एप्लस काम्पूटरच्या माधवी परब, अंबिका काम्प्यूटरचे परेश सावंत यांसह सर्व शिक्षक विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर,अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून आणि आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली
सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण व्हावी आमली पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच यापासून युवा पुढील दूर राहावी या उद्देशाने आचरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळा कॉलेजांमध्ये जागृती करण्यात आली .यात न्यू इंग्लिश स्कूल आचरा, इंग्लिश मिडीयम स्कूल आचरा,रामगड हायस्कूल,असरोंडी हायस्कूल, त्रिमूर्ती हायस्कूल शिरवंडे,आडवली हायस्कूल,त्रिंबक हायस्कूल या शाळांमध्ये जागृती करण्यात आली.यावेळी सायबर सुरक्षे बाबत व्हिडिओ, पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले .

error: Content is protected !!