अखेर मृत बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाखांचा निधी अदा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा विशेष पाठपुरावा
हायवे ठेकेदार कंपनीच्या पोलचा शॉक लागून बाळकृष्ण तावडे यांचा झाला होता मृत्यू
हायवे ठेकेदार कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे ठेकेदार कंपनीकडून अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली. याकरिता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत, महेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यानी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. ही रक्कम अदा करताना नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत, किशोर राणे यांनी या रक्कमेचा धनादेश श्रीमती सुहासिनी तावडे याना सुपूर्द केला. या प्रसंगी कुटुंबीयांनी सर्वाचे आभार मानले. शिशिर परुळेकर यांचे कुटुंबीयानी विशेष आभार मानत, नगराध्यक्ष आणी टीम ला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले.
दिगंबर वालावलकर कणकवली





