कणकवली टेंबवाडी मध्ये रस्त्यावरच चिरे उतरल्याने वाहतुकीस होतोय अडथळा

नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का?
काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांचा सवाल
कणकवली शहरातील एस एम हायस्कूल समोर टेंबवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावरती चिरे उतरल्याने या रस्त्यावर वाहतुकीला हे चिरे अडथळा ठरत आहेत. कणकवली नगरपंचायत हद्दीतील या रस्त्यावर चिरे उतरल्यामुळे जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. कणकवली नगरपंचायत यावर काय कारवाई करणार? असा सवाल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक प्रदीप मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शहरातील जनतेच्या सोयीसाठी नव्याने रस्ते केलेले असतानाही रस्ते अतिक्रमण करून अडवले जात असल्याने याबाबत नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का? असा देखील सवाल श्री. मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे.





